शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे पूनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार १ लाख ५० हजार रुपयांचे मर्यादेत कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:51 IST

अकोला : कर्जमाफी योजना फसवी असल्याचे आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही झाले. त्यावर आता १२ डिसेंबर रोजी शुद्धीपत्रक काढून आता ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर कर्जाचे पूनर्गठण केलेल्या शेतकºयांनाही १ लाख ५० हजार रुपयांचे मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देशासनाने १२ डिसेंबर रोजी आधीच्या सर्व निर्णयातील मुद्यांबाबत शुद्धीपत्रक काढले. ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर कर्जाचे पूनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार. थकित असलेली रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१८ पर्यंत भरल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

अकोला : विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयातील काही अटींमूळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून वंचित राहण्याची वेळ आली. कर्जमाफी योजना फसवी असल्याचे आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही झाले. त्यावर आता १२ डिसेंबर रोजी शुद्धीपत्रक काढून आता ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर कर्जाचे पूनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांनाही १ लाख ५० हजार रुपयांचे मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.कर्जमाफीच्या निर्णयात तत्त्वत:, निकष आणि सरसकट या शब्दांचा खेळ केल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहण्याची वेळ आली. शासनाने २८ जून रोजी कर्जमाफीच्या निर्णयात काही मुद्दे स्पष्ट केले. त्यामध्ये ज्या कारणासाठी कर्जमाफीची मागणी पुढे आली, त्यातील प्रमुख असलेली सात-बारा कोरा करणे, ही मागणी डावलण्यात आली होती. ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले १ लाख ५० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंतचे कर्ज शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे शासनाने सांगितले होते. दुसरे म्हणजे, कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकºयांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत कर्ज ठरलेल्या मर्यादेत शासन भरणार आहे; मात्र त्याचवेळी पुनर्गठनानंतर २०१६-१७ या वर्षासाठी घेतलेले नवे कर्ज परतफेड केल्यासच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे चालू वर्षाचे कर्ज भरल्याशिवाय बँकांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी उभे केले नाही. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहण्याची वेळ आली. त्यावर विरोधी पक्ष, विविध शेतकरी संघटनांनी आवाज उठवला. त्याची दखल घेत शासनाने ७ डिसेंबर २०१७ रोजीही शुद्धीपत्रक काढले. मात्र, त्यातही कर्जाचे पूनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांना लाभापासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली.

काय म्हणते, शुद्धीपत्रक..दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याची दखल घेत शासनाने १२ डिसेंबर रोजी आधीच्या सर्व निर्णयातील मुद्यांबाबत शुद्धीपत्रक काढले. त्यामध्ये ३१ मार्च २०१६ पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर पूनर्गठित-फेरपूनर्गठित झालेल्या कर्जाचे ३१ जुलै २०१७ पर्यंत थकीत व उर्वरित हप्ते, १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत असल्यास, तसेच त्या रकमेपेक्षा अधिक थकित असलेली रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१८ पर्यंत भरल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.